'औरंगाबादेत ‘एम्स’, ‘आयआयटी’ उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार'

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ‘आयएमए’तर्फे सत्कार
भागवत कराड
भागवत कराडभागवत कराड

औरंगाबाद: देशातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थां (एम्स) ची संख्या सातवरुन २२ वर गेली. एका राज्यात एकच ‘एम्स’ देण्यात येईल ही अट आहे. तरीही महाराष्ट्र मोठे राज्य आहे. त्यामुळे औरंगाबादेत ‘एम्स मिळावे. तसेच पवई आयआयटीचे उपकेंद्रही मिळावे यासाठी मी प्रयत्नशिल आहे. सोबतच जोपर्यंत मराठवाड्याचा विकास होणार नाही तोपर्यंत मी समाधानी नाही, असे मत नवनियुक्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

व्यवसायाने डॉक्टर व एकेकाळी ‘आयएमए’चेच एक भाग असलेले आणि आता केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल डॉ. भागवत कराड यांचा रविवारी (ता. सहा) ‘आयएमए’ तर्फे सत्कार झाला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. कराड बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ‘आयएमए’चे राज्य उपाध्यक्ष डॉ. यशवंत गाडे, शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, उपाध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. संजय सावजी, डॉ. अंजली गाडे, डॉ. अपर्णा रंजलकर, डॉ. सचिन फडणीस, डॉ. दत्ता कदम, डॉ. मंजुषा शेरकर, डॉ. कराड यांचे वर्गमित्र डॉ. सुरेंद्र जैस्वाल, डॉ. मंगला बोरकर यांची उपस्थिती होती.

भागवत कराड
मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मोदींनी केलेल्या सत्कारापेक्षा हा सत्कार मोठा
महाराष्ट्र सदनमधील सत्कार अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सत्कारापेक्षा ‘आयएमए’ने केलेला सत्कार माझ्यासाठी मोठा आहे. ‘आयएमए’मधूनच माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. माझ्या गावात सर्व डॉक्टर्स मित्र, वर्गमित्रांसमोर माझा सत्कार होत आहे हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा सत्कार आहे असे सांगताना डॉ. कराड भावुक झाले होते.

डॉ. कराड यांनी मांडलेले मुद्दे-
- शहरात पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट, हा प्रश्‍न सोडविण्यावर अधिक भर.
- २५ वर्षात जिल्ह्यात पर्यटनाबाबत नवीन एकही गोष्ट नाही. पर्यटन विद्यापीठासाठी प्रयत्न.
- साऊंड लाईट प्रकल्प दौलताबाद, घृष्णेश्‍वर, बिबी- का मकबरा येथे राबविणार.
- उस्‍मानाबाद, परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्नशिल.
- मराठवाड्यातील मानव विकास निर्देशांक उंचावण्यावर देणार भर.
- संरक्षण क्षेत्रातील उद्योगासाठी प्रयत्नशिल.
- आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने विकासासाठी प्रयत्न करणार.
- मराठवाड्यातील प्रलंबित सोडविण्यावर भर.
- ‘आयएमए’, डॉक्टरांचे प्रश्‍न प्राधान्यांने सोडविणार.

भागवत कराड
'मराठवाड्याशी संबंधित कार्यालये औरंगाबादमध्ये आणू'

तु राजकारणातच जा..
‘‘वैद्यकीय क्षेत्रापेक्षा राजकारणात मोठी संधी आहे. राजकारणातच जम बसव.’’ असा सल्ला डॉ. कराड यांना त्यांच्या वर्गमित्राने दिला आणि तो डॉ. कराड यांनीही तंतोतंत पाळला.’’ रविवारी सत्कार प्रसंगी याच गोष्टीचा आवार्जून उल्लेख डॉ. कराड व त्यांच्या मित्राने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com