esakal | मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

Voting

मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औसा : औसा शहराची ३५ वर्षांनंतर २९ डिसेंबर २०२० ला शासनाने हद्दवाढ मंजूर केली. शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या नागरिकांना होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत शहरात मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा हक्क द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी निवडणूक विभागाकडे केली. मागणी मंजूर झाली नाही तर न्यायालयात दाद मागू, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये मनसेचे घंटानाद आंदोलन; पाहा व्हिडिओ

डॉ. अफसर शेख यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने वॉर्ड रचनेसंदर्भात २०११ ची संख्या ग्राह्य धरण्याचे निर्देश दिलेले आहेत. २०११ मध्ये नवीन हद्दवाढ परिसरात प्रगणक गट केलेले नव्हते. त्यामुळे येथील हद्दवाढीतील नागरिकांना मतदान करण्यास अडचण येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना त्यांचा लोकप्रतिनिधीही मिळणार नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचितच राहणार आहे. भागाची लोकसंख्या पाहता या भागातून नवीन किमान तीन वॉर्ड अस्तित्वात येणे गरजचे आहे.

हेही वाचा: कोरोनारुग्ण असलेल्या गावात शाळा बंदच; पाहा व्हिडिओ

वर्ष २०११ ते २०२१ या दहा वर्षांत लोकसंख्येत भर पडल्याने या भागातील लोकसंख्येचा नवीन सर्वे करावा, पालिकेची सदस्य संख्या निश्चित करताना नवीन हद्दवाढीत समाविष्ट भागात नवीन वॉर्ड करावेत, पर्यायी पालिकेच्या एकूण वॉर्ड संख्येत वाढ करावी, या नवीन वसाहतीत नाव नोंदी, नावात बद्दल यासाठी मोहीम राबवावी, या परिसरात मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी, शहरातील इतर वॉर्डाची रचना करताना निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशाचे पालन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.

loading image
go to top