

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: अजिंठा लेणीत आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी पर्यटकांना डंख केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. योग्य माहिती व सावधगिरी बाळगल्यास हा धोका टाळता येतो, असे मधमाशी तज्ज्ञांनी सांगितले. त्यांच्या पोळ्याभोवती झालेला मानवी हस्तक्षेप, मोठा आवाज, गडद रंगाचे कपडे, तीव्र सुगंध किंवा अचानक हालचाल यामुळे त्या आक्रमक होतात.
मोहोळही उठू शकते.मधमाश्यांवरील संशोधक तज्ज्ञ डॉ. भालचंद्र वायकर यांच्या मते, आग्या मधमाश्यांचे मोहोळ उंच झाडांवर, पाण्याच्या टक्या, उंच इमारतींवर, गड किल्ल्यांचे बुरूज, लेण्यांच्या कपारीत आढळते. शेकोटी पेटविणे, धूर करणे, सिगारेट ओढणे, धूळ उधळणे, जोराचा आवाज, ढोल किंवा वाद्यांचा आवाज, फटाके वाजविणे, जमीन हादरेल अशा प्रकारची कामे करणे, जोराची हवा येणे, पोळावर पक्षी, उंदीर यांनी हल्ला करणे, त्यांना शत्रू दिसला नाही व त्याच वेळी जवळ असणारी व्यक्ती किंवा प्राणी दिसल्यास मधमाशा डंख मारतात.