Ajanta Caves tourist rush holiday season
Sakal
फर्दापूर (ता. सोयगाव): जागतिक वारसा स्थळ आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये नाताळच्या सुट्यांत पर्यटकांचा महापूर लोटला आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल २९ हजार ५५३ पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिल्याने लेणी परिसर पर्यटकांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत होता.