Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांचा पोलिस अधीक्षकांसमोरच संताप; म्हणाले, चार तासात सगळी माहिती आणा...
Beed News : अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नव्हते. प्रकृती ठीक नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर असून सकाळी पोलिस अधीक्षकांसमोरच अधिकाऱ्यांवर संतापले. मी तुम्हाला चार तास देतो सगळी माहिती तयार ठेवा असं म्हणत अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.