esakal | मिडियाला फक्त मीच दिसताे : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ajit-pawar.jpg

राज्य सहकारी बँकेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिलेल्यांमध्ये भाजप-सेनेसह 75 जणांचा समावेश आहे. मीडियाला फक्त मीच दिसतो असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते अजित पवार म्हणाले. 

मिडियाला फक्त मीच दिसताे : अजित पवार

sakal_logo
By
प्रा. प्रवीण फुटके

परळी : राज्य सहकारी बँकेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिलेल्यांमध्ये भाजप-सेनेसह 75 जणांचा समावेश आहे. मीडियाला फक्त मीच दिसतो असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते अजित पवार म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी रात्री परळीत पोचली. यावेळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. 
अजित पवार म्हणाले, आपण राज्य सहकारी बँकेच्या अर्ज आणि कार्यकारी समितीच्या एकही बैठकीला हजर नव्हतो. न्यायालयाने गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिलेल्यांत भाजप-शिवसेनेच्याही नेत्यांचा समावेश आहे. परंतु, मीडियाला फक्त मीच दिसतो, तसेच  आपण एक रुपयांचाही मींधा नसल्याचे ते म्हणाले.

सत्ता द्या सहा महिन्यात सातबारा कोरा करू -  भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव वापरून दिलेली करमाफी फसवी असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. सत्ता दिल्यानंतर सहा महिन्यांत कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करू. आपण दिलेला शब्द पाळतो असेही पवार म्हणाले.

loading image
go to top