
ajit pawar
esakal
बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेचा बहुप्रतिक्षित शुभारंभ आज थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार पंकजा मुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या नागरिकांना चांगल्या सवयी अंगीकारण्याचा सल्ला देताना काहीशी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.