अजित पवार गटाचे मंञी संजय बनसोडे यांच तुतारी वाजवून स्वागत; राजकीय चर्चेला उधान

शहरातील तालुका क्रिडा संकुलाच्या मैदानावर स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Ajit Pawar group minister Sanjay Bansode was welcomed by playing trumpet politics
Ajit Pawar group minister Sanjay Bansode was welcomed by playing trumpet politicsSakal
Updated on

उदगीर : शहरातील तालुका क्रिडा संकुलाच्या मैदानावर स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.९)सांयकाळी ७ वाजता स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटनावेळी आजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचे आगमन होताच तुतारी वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये फुट झाल्यानंतर निवडणुक आयोगाने तुतारी वाजवणारा माणुस हे राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणुक चिन्ह दिल्यामुळे तुतारी चर्चेत आली आहे. मराठवाड्यात या भागात येरवी कुठल्याही कार्यक्रमात तुतारी वाजवली जात नाही. माञ कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकाने स्वागतासाठी खास तुतारी वाजवल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तुतारी चिन्हाची फुकटाच प्रसिद्धी मिळाली आहे.

उदगीर मतदार संघात शरद पवार यांच्या विचाराला माननारा मतदार संघ असल्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नामदार बनसोडे यांनी हि निवडणुक जिंकली होती. सध्या ते अजित पवार यांची साथ देत. सत्तेत सहभागी होवुन मंञी पदावर विराजमान झाल्यामुळे मतदार संघात मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे कार्यक्रम घेत आहेत.

कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातुन मतदार संघात मोठ मोठे बॅनर लावण्यात आले होते. मैदानात मनोरंजनाचे कार्यक्रम ,लेजर शो, फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष करत मंञ्याने प्रसिद्धी केली असली तरी चर्चा तुतारीच्या निनादाने सर्वाचे राजकीय चर्चा रंगली होती. या पुढे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याना कुठल्याही कार्यक्रमात तुतारी वाजवु नये असे फर्मान निघाल्यास नवल वाटु नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Marathi News Esakal
www.esakal.com