Ajit Pawar News: बीडचा पालकमंत्री राष्ट्रवादीचा होणार, अन्य जिल्ह्याचं काय?; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Ajit Pawar News
Ajit Pawar News
Updated on

Ajit Pawar News: बीड जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सगळ्या जिल्ह्यांना मी न्याय देणार आहे. विकासासाठी आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आलो असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.

अजित पवार आज बीडमध्ये आयोजित सभेत बोलत होते. या सभेत छगन भूजबळ, धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. मात्र अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट न बोलता विकासकामांची माहिती दिली.

पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. बीडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पदावरून महाराष्ट्राच्या राजकारणात अंतर्गत वाद निर्माण झाला होता. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित) 9 मंत्र्यांचा शपथविधी होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. परंतु, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्याप पालकमंत्रीपद मिळालेले नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह 6 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार आहे. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नांदेड, धुलिया आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. 10 कॅबिनेट मंत्र्यांकडे 2-2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. 6 कॅबिनेट मंत्र्यांकडे 1-1 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे.

Ajit Pawar News
Raj Thackeray : खळखट्याक'चा राज ठाकरेंच्या मनसेला का फायदा होत नाही?

कोणत्या पक्षाचे किती पालकमंत्री

भाजपचे पालकमंत्री-10

शिवसेनेचे पालकमंत्री (शिंदे)-9

राज्य मंत्रिमंडळाची सद्यस्थिती

भाजपचे मंत्री - 10

शिवसेना (शिंदे)- 10

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- 9

Ajit Pawar News
Ajit Pawar Beed Sabha: "धनंजय मुंडेंबाबत कोण काय बोलून गेलं पण..."; बीडमधील सभेत अजित पवार काय म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com