esakal | सरकार उलथवून टाका - अजित पवार

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar
सरकार उलथवून टाका - अजित पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - खरिपाची पिके उद्‌ध्वस्त झाली असताना, सरकार अजूनही गाजर दाखविण्याचेच काम करीत आहे. झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत? थोडी तरी माणुसकी शिल्लक राहिली आहे की नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज येथे केला. सामान्यांची जाण नसलेल्या या सरकारला उलथून टाकल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे ‘संविधान बचाव, देश बचाव’ मोहिमेअंतर्गत मंगळवारी मेळावा घेण्यात आला. पवार म्हणाले, की प्रश्‍न सोडवता येईनात आणि मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, की २०१९ ला मीच मुख्यमंत्री! सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे पुरेसा कोळसा असायला हवा ना!’’ 

लोकसभेचा विचार करताय का?
धनंजय, तुमचे हिंदीतील भाषण आज प्रथमच ऐकले. लोकसभेचा विचार करताय का, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंडे यांच्यावर चांगलीच गुगली टाकली.