ajit pawar and dhananjay munde
sakal
बीड - नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला अन् राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यातच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्ष अंतर्गत गटबाजीमुळे घडी विस्कटली असून, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना स्टार प्रचारक असलेल्या धनंजय मुंडेंना मात्र परळी सुटत नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा झाल्या. मात्र, यात धनंजय मुंडे यांची सभेला दांडी असल्याचे दिसून आले.