

A farmer cultivates ajwain on seven acres in Dhoragaon village of Gangapur taluka.
esakal
शेंदूरवादा : दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला. कोरडवाहू शेतीचे लाखो हेक्टर क्षेत्र, पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी पडणारी निराशा आणि वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे संकट. अशा प्रतिकूल परिस्थितीतही गंगापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करत आशेची पेरणी केली आहे. पाण्याअभावी पारंपरिक पिकांचे गणित बिघडत असताना पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या ओवा, बेबीकॉर्न आणि हुरडा या पिकांच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.