देगलूर - तेलंगणातील निजामसागर, पोचमपाड, मुखेड तालुक्यातील लेंडी व कंधार तालुक्यातील लिंबोटी धरणातील पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे लेंडी, मांजरा, मन्याड, या नद्यांना बॅक वॉटर मुळे मोठा पूर आला..गोदावरीचे पात्र धर्माबाद तालुक्यातील संगम येथे मांजरा नदीला मिळत असल्याने त्याचेही बॅकवॉटर मुळे देगलूर तालुक्याला मोठा फटका बसला. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती गंभीर बनली होती. देगलूर शहराजवळील लेंडी नदीवरील पुलाच्या बाजूने पाणी जात होते. देगलूर ते भायेगाव रस्त्यावरील पुलाच्या वरून पाणी जात असल्याने ते पाणी शहरातील अनेक वस्त्यात शिरले होते..तर वझरगा जवळील मन्याड नदीच्या पुलाच्या बाजूने रस्त्यावरून चार फूट पाणी जात असल्याने अकोला ते देगलूर ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल ३६ तासानंतर वाहतुकीसाठी शनिवारी ता. ३० रोजी खुला करण्यात आला. दरम्यान हैदराबादला जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या या भागात मोठी असल्याने या कालावधीत प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली..वझरग्याच्या शेतकरी अडकला होता झाडावर...वझरगा येथील मारुती हनुमंत कोकणे हा भाजीपाला आणण्यासाठी शेतात गेला असताना त्याला पुराच्या पाण्याने वेढले. त्याने झाडाचा आसरा घेऊन थांबला असताना त्यास देगलूर नगर परिषदेच्या कर्मचारंयानी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले..राज्य आपत्ती दलाने मेदकल्लूरचे ८ नागरिकांना सुरक्षितस्थळी आणले...मेदनकलूर येथील ८ नागरिक पुराच्या पाण्यात गावात अडकून पडले होते. त्यांना राज्य आपत्ती दलाच्या जवानांनी सुखरूपपणे सुरक्षितस्थळी आणून सोडले. यावेळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी बिडिओ श्री बळदे, मुख्याधिकारी सौ कांबळे ,पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती..खानापूरच्या नागरिकाचा जीव वाचला...लेंडी पुलाच्या बाजूने पाणी जात असताना खानापूर येथील दूध विक्रेते शंकरराव विभूते हे देगलूरला दूध विक्रीसाठी गेले होते ते पुन्हा खानापूरला जात असताना त्यांची मोटरसायकल पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना बागनटाकळी येथील ऑटो चालक शेख बाबू मिया हे प्रसंगावधान राखत त्यांना पकडून ठेवले व पुन्हा नागरिकांनी मानवी साखळी करीत पुराच्या पाण्यातून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले..शनिवारी ता. ३० रोजी दुपारनंतर बहुतांशी भागातील पुराचे पाणी ओसरू लागल्याने अनेक नागरिक परत गावाकडे जाताना पाहायला मिळाले. तालुक्यातला देगलूर हाणेगाव हा मार्ग सोडला तर इतर सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून, बहुतांशी मार्गावर एसटी बस ही सोडण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख संजय आकुलवार यांनी दिली..१२ गावातील ६ हजार नागरिक परत फिरू लागले...तालुक्यातील शेळगाव, मेदनकल्लूर सांगवीउमर, शेखापूर, कुरुडगी, मंडगी, थडीसावरगाव, टाकळी वडग, शेवाळा हनुमानहिपरगा, सुडंगी या १२ गावातील जवळपास सहा हजार लोकांना पुराच्या पाण्यामुळे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. ते सर्व नागरिक 'महालक्ष्मी' या सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ता. ३० रोजी दुपारनंतर पूर ओसरू लागल्याची बातमी लागताच परत गावाकडे चालल्याचे दिसून आले..देगलूर - राज्य आपत्ती दलाच्या जवानांनी मेदनकलुर येथील आठ नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. तर दुसऱ्या छायाचित्रात वझरगा येथील मारुती कोकणे हा पुराच्या पाण्यात झाडावर अडकून पडला होता. त्याची देगलूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. यावेळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.