राजेश मिश्रा यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांना हलविले रुग्णालयात

अकोला: महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात चर्चा करण्याकरिता विशेष सभा बोलाविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी अकोला महापालिकेपुढे सोमवार (ता. १९) पासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

अकोला महापालिका क्षेत्रातील मालमत्तांची तब्बल १६ वर्षांनंतर करवाढ करण्यात आली. ही वाढ करताना नगररचना विभागाच्या नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करीत काँग्रेस आणि शिवसेनेसह मनपातील विरोध पक्ष नगरसेवकांना महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे चर्चेकरिता विशेष सभा बोलाविण्याचे पत्र दिले होते. तीस नगरसेवकांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या या पत्राचा विचार न झाल्याने सोमवारपासून शिवसेनेचे राजेश मिश्रा आणि काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन यांनी आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाकडे पाठ फिरवून महापौर अग्रवाल मुंबईला रवाना झाले.

दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी शिवसेना गटनेत्याची प्रकृती खालावली. त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. महापौरांकडून विशेष सभा बोलाविण्याबाबत कोणतेही आश्‍वासन न मिळाल्याने त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला होता. अखेर त्यांना बळजबरीने उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी धाव घेवून आंदोलकांची विचारपूस केली.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news shivsena rajesh mishra shift to hospital