गोवानिर्मीत दारु जप्त, राज्य उत्पादन शुल्क 

file photo
file photo

नांदेड : नववर्षाच्या पूर्व संध्येला नांदेड जिल्ह्यात आलेल्या गोवानिर्मीत दारुचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. ही कारवाई खरब खंडगाव (ता. मुखेड) परिसरात रविवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास पथकप्रमुख एस. एस. खंडेराय यांच्या पथकांनी केली.

नांदेड जिल्हा तेलंगना व कर्नाटक राज्याच्या सिमेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात अवैध मार्गाने अवैध दारु मोठ्या प्रमाणात येत असते. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाकडून अनेक वेळा कारवाई होऊन लाखोंची दारु जप्त केल्या जाते. तरीही अवैध धंदेवाल्यांंवर कारवाईचा काही फरक पडत नाही. जिल्ह्यात असे धंदे करणाऱ्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव उत्पादन शुल्कचे अधिक्षक निलेश सांगडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. शहर व जिल्ह्यात अवैध देशी दारु, हातभट्टी, सिंदी आणि गोवानिर्मीत बनावट विदेशी दारु विकणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर हा विभाग लक्ष ठेवून असते.

बनावट दारु घातक 

दोन दिवसांवर येऊन ठेपलेले नविन वर्ष हे साजरे करण्यासाठी तरूणाई व मदिरा शौकीन सज्ज झाले आहे. मद्य शौकीनाना दारुचा दर्जा समजत नसल्याने अनेक चोरीच्या मार्गे बनावट दारु धाबे व खानावळी तसेच बारमध्येसुध्दा पुरविल्या जाते. बनावट दारुचा थेट दारु पिणाऱ्यांच्या शरिरावर गंभीर परिणाम पडतात. तरीही तो दारु सोजडायला तयार नसतो. अशाच पध्दतीची गोवानिर्मीत दारु नांदेड जिल्ह्यात एका वाहनामऊधन येत असल्याची गुप्त माहिती निलेश सांगडे यांना मिळाली. त्यांनी लगेच निरीक्षक एस. एस. खंडेराय यांना सुचना दिल्या. या सुचनेवरून खंडेराय यांनी आपल्या पथकाला घेऊन नांदेड सोडले. ते मुखेड तालुक्यात पोहचले. 

खरब खंडगाव पाटीजवळ कारवाई

खरब खंडगाव पाटीजवळ एक कार (एमएच२४-एएस-१३०८) येताच त्यांनी थांबविली. चालकाला ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीत गोवानिर्मित इम्पेरिअल ब्लु व्हीस्कीचे पाच बॉक्ससह कार असा चार लाखाचा मुद्मेमाल जप्त केले. चालक व मालक गुरूप्रसाद पाटील याला ताब्यात घेऊन जप्त कार व मुद्देमाल घेऊन पथकांनी नांदेड गाठले. तसेच अटक केलेल्या आरोपीची कसुन चौकशी केली असता त्यच्या माहितीवरून लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारावई करून याच कंपनीची बनावट दारुचे १० बॉक्स जप्त केले. 

यांनी घेतले परिश्रम

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली निरीक्षक एस. एस. खंडेराय, नांदेड निरीक्षक डी. एन. चिलवंतकर, आर. एस. कोतलवाल, भगवान मंडलवार, वाय एस. लोळे, आशालता कदम, मोहम्मद रफी अबुदल वहाब, के. आर. वाघमारे, खिल्लारे, बालाजी पवार, गणेश रेणके, विकास नागमवाड, अब्बास पटेल, श्रीनिवास दासरवार, परमश्‍वर नांदुसेकर, भोकरे, इंगोले, खतीब आदीनी परिश्रम घेतले. या प्रकरणाचा तपास निरीक्षक श्री. खंडेराय करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com