
उमरगा, (जि धाराशिव) - राज्य सरकारने महसुल वाढवण्यासाठी मद्य विक्रीवर लावलेला भरमसाठ विक्री कर, परवाना नुतनीकरण अन् सेवा करामुळे मद्य विक्रीचे दर वाढल्याने मद्य शौकिनांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. तर बार चालकाकडून कडून यापुढे जाऊन अव्वाच्या सव्वा भावाने दारू विक्री केली जात असल्याने, ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागत असल्याने झिंगाट झालेल्या ग्राहकांच्या तक्रारीला विक्रेत्यांना तोंड द्यावे लागत आहे.