मद्यपी चढला विद्युत खांबावर; पत्नीला केला फ्लाइंग किस

photo
photo

सेनगाव (जि. हिंगोली) : येथील जुन्या ग्रामीण रुग्णालयासमोरील विद्युत खांबावर मद्यधुंद अवस्थेत एक ३५ वर्षीय तरुण सिने स्टाइलने चढला. तब्बल एक तास पोलिस व नागरिकांच्या शर्तीच्या प्रयत्नाने त्याला खाली आणण्यात यश आले. हा प्रकार शुक्रवारी (ता. १३) रात्री नऊ वाजता घडला. पत्नीला फ्लाइंग किस केल्यानंतर तो पोलिसांच्या मदतीने खाली उतरला.

येथील जुन्या ग्रामीण रुग्णालय परिसरात सुनील रणबावळे (वय ३५) हा तरुण राहतो. त्याने शुक्रवारी दुपारीच मद्यधुंद अवस्थेत पत्नीसोबत वाद करीत पत्नीला मारहाण केली. त्यानंतर पत्नीने इतरत्र ठिकाणी आसरा घेतला. या प्रकारामुळे सुनील रणबावळे रात्री आठ वाजता विद्युत खांबावर चढला. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तत्काळ वीज महावितरण कंपनीशी संपर्क साधून शहरातील विद्युतपुरवठा खंडित करण्याचे कळविले. 

पोलिस कर्मचारीही चढले खांबावर
 
विद्युतपुरवठा बंद झाला. मात्र, मद्यधुंद अवस्थेतील सुनील चक्क विद्युत वाहिनीच्या तारावर जाऊन बसला. या प्रकाराची माहिती कळताच येथील पोलिस उपनिरीक्षक श्री. माखणे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी सीडी आणून कर्मचारी खांबावर चढले. दरम्यान, सदर घटनेची शहरभर वार्ता पसरली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली. पत्नी येत नाही तोपर्यंत खाली येणार नसल्याची भूमिका मद्यपीने घेतली. त्यानंतर त्याची पत्नी घटनास्थळी दाखल झाली. 

समजूत घातल्यावर उतरला खाली

पत्नी आल्यानंतर सुनीलने खांबावरूनच पत्नीला फ्लाईंग कीस फेकला. मात्र, त्यानंतरही तो खाली येण्यास तयार नव्हता. अखेर त्याची समजूत घातल्यानंतर शोले स्टाईलने खांबावर गेलेल्या सुनीलला खाली आणण्यात पोलिस व नागरिकांना यश आले. दरम्यान, पत्नीला केलेला फ्लाइंग किस चर्चेचा विषय बनला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कोणती कारवाई केली याची माहिती समजू शकली नाही. 

दारूच्या कारणावरून ढाबाचालकास मारहाण

कनेरगाव नाका (जि. हिंगोली) हिंगोली तालुक्‍यातील कनेरगाव नाका येथे बंद असलेल्या ढाब्यावर दारू पिण्यासाठी का देत नाही, असे म्‍हणत ढाबाचालकास शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दहा ते पंधरा जणांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १२) गुन्हा दाखल झाला आहे. कनेरगाव नाका येथे मंगळवारी (ता. दहा) राजेश शर्मा यांच्या मालकीचा ढाबा व पेट्रोलपंप आहे. धुलीवंदनाच्या दिवशी ढाबाचालक अविनाश कांबळे यास संतोष गावंडे याने ढाबा बंद असताना दारू पिण्यासाठी का देत नाहीस, या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 तसेच गल्‍ल्‍यातील दोन हजार ७०० रुपये, साक्षीदार चंद्रकांत कांबळे यांची गाडी भाड्याची आलेली रक्‍कम १७ हजार ५०० रुपये मारहाण करीत जबरीने काढून घेतले. याप्रकरणी अविनाश कांबळे यांच्या फिर्यादीवरून संतोष गावंडे, जगन गावंडे, नारायण गावंडे, संदीप गावंडे, विष्णू गावंडे, अनिल गावंडे, संजय गावंडे (सर्व रा. वांझोळा) आणि त्‍यांच्या सोबत दहा ते बारा जणांविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ए. जी. खान पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com