कोरोनाचे सावट- हिंगोलीत २१ हजार कोंबड्या जीवंत गाडल्या

फोटो
फोटो

औंढा नागनाथ  (जिल्हा हिंगोली) ः कोरोना विषाणूच्या भीतीने व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीने पोल्ट्री फार्म व्यवसाय धोक्यात आला आहे. कोंबड्या खाल्ल्याने कोरोनाची लागन होत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. त्यामुळे खरेदी बंद झाली असून पोल्‍ट्री व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील दरेगाव येथील जगदंबा बॉयलर अंडी, कुकुटपालन व्यवसायिकाने गुरुवारी (ता. १२) जेसीबीने खड्डा करून २१ हजार कोंबड्या पुरल्या आहेत.

काही दिवसांपासून कोरोना विषाणूची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. या बाबात सर्वच स्तरांतून खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. कोरोना विषाणूची लागन होऊ नये, यासाठी नागरिक दक्ष झाले आहेत. मात्र, यामध्ये पोल्ट्री फार्म व्यावसायिकांनाही फटका सहन करावा लागत आहे. कोंबडे खाल्याने कोरोना विषाणूची लागन होत असल्याची अफवा सोशल मीडियात पसरत आहे. 

व्यवसायच बंद करण्याचा घेतला निर्णय

त्यामुळे अनेकांनी मासांहार टाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोंबड्यांची विक्रीच होत नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कोंबड्या सांभाळण्याचा खर्च पेरवत नसल्याने व खाद्याच्या किमतीत वाढ झाल्याने हा व्यवसायच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, जवळ असलेल्या कोंबड्यांचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण होत आहे. यातून औंढा नागनाथ तालुक्‍यातील दरेगाव येथील जगदंबा कुकुटपालन व्यावसायिक सुनील जाधव व लक्ष्मण जाधव यांनी गुरुवारी २१ हजार कोंबड्या जमिनीत पुरल्या.

दर दिवसाला चाळीस हजारांचे खाद्य

 दर दिवसाला २१ हजार कोंबड्यांना चाळीस हजारांचे खाद्य लागते. हे खाद्य मका, सोयाबीन औषधी आणायचे कुठून, कोंबड्या कोणी विकत घेत नसेल तर झालेला खर्च निघणार कसा, असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. कोंबड्यांसाठी कच्चा माल आणलेल्या व्यापाऱ्यांचे दहा लाख रुपये, बुलडाणा अर्बन बँकेचे तीन लाख, सोसायटी व ग्रामीण बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज झाले आहे. हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

याला कंटाळून कोंबड्या पुरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या वेळी दुर्गादास राठोड, सुनील राठोड, सुमन जाधव, आशा राठोड, जया जाधव, रुक्मिणी जाधव, डॉ. केशव वाघमारे, मुक्तार कुरेशी, गणेश नागरे, डॉ. सुभाष निरगुडे, प्रकाश फेगडे आदींची उपस्‍थिती होती. दरम्‍यान, या बाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com