Ghansawangi Flood: जायकवाडी प्रकल्पातून सुरू झालेला मोठा पाणी विसर्ग; नदीकाठच्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत, प्रशासन सतर्क
Flood News: जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्यामुळे घनसावंगी तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये आणि जनजीवन तसेच मालमत्तेची हानी टाळावी.
घनसावंगी : जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण जि. छत्रपती संभाजी नगर प्रकल्पामधून पाण्याचा करण्यात येत असलेल्या विसर्गाबाबत धरणाखालील घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदी काठाच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे.