अख्खं प्रशासन झटले; पण ग्रामीण रुग्णालये जागचे नाही हटले

विशेष म्हणजे स्त्री रुग्णालय नेकनूर, ग्रामीण रुग्णालय तालखेड, उपजिल्हा रुग्णालय परळी, ग्रामीण रुग्णालय रायमोह, ग्रामीण रुग्णालय चिंचवण या पाच रुग्णालयांतील चाचण्यांचा आकडा शून्य आहे
doctor
doctordoctor

बीड: कोरोना उपाय योजनांसाठी अगदी त्यांचे क्षेत्र नसतानाही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून खाली बहुद्देशीय कामगार आणि वॉर्डबॉय देखील प्रयत्नशील असताना ग्रामीण रुग्णालयांची कामगिरी निराशाजनकच नाही तर आरोग्य विभागासाठी लाजिरवाणी आहे. कोविड उपचाराचे काम शून्य करणाऱ्या या ग्रामीण रुग्णालयांना अगदी कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचण्यांसाठी स्वॅब घ्यायलाही हात थरथरत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
सोमवारी (ता. २१) केलेल्या कोरोना चाचण्यांवर नजर टाकली असता एका प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या चाचण्यांची संख्या जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांनी केलेल्या चाचण्यांपेक्षा अधिक आहे. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांनी ३०६ चाचण्या केल्या असून एकट्या कुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत झालेल्या चाचण्यांची संख्या ३१७ आहे.

विशेष म्हणजे स्त्री रुग्णालय नेकनूर, ग्रामीण रुग्णालय तालखेड, उपजिल्हा रुग्णालय परळी, ग्रामीण रुग्णालय रायमोह, ग्रामीण रुग्णालय चिंचवण या पाच रुग्णालयांतील चाचण्यांचा आकडा शून्य आहे. तर, नांदूरघाट, धारुर व धानोरा ग्रामीण रुग्णालयांना दहा तपासण्यांचा आकडाही गाठता आला नाही. एकमेव आष्टी ग्रामीण रुग्णालयाला कशीबशी शंभरी पार (१२३) आणि केज ग्रामीण रुग्णालयाला तपासण्यांची पन्नाशी पार (८२) करता आली आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेचा कहर करण्यासाठी आतापासूनच रुग्णांची शोध मोहीम हाती घेण्याचे आणि जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट कमी करण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत असताना नागरी यंत्रणा अशी हातावर हात मांडून बसणार असेल तर तिसऱ्या लाटेचे दिव्य कसे पेलायचे असा प्रश्न आहे.

doctor
२६ जूनचा 'चक्का जाम' ताकदीनिशी यशस्वी करा: पंकजा मुंडे

कोरोना उपचाराचे कामही शून्य -
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मोठा होता. या काळात अगदी काही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथील स्त्री रुग्णालय आणि मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्रांतील कोविड केअर सेंटरने जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या तोडीचे कोविड उपचार करुन नावलौकीकही केला. असे असताना दुसरीकडे मात्र चिंचचण (ता. वडवणी), धानोरा (ता. अंबाजोगाई), तालखेड (ता. माजलगाव), नांदूरघाट (ता. केज), रायमोह (ता. शिरुर कासार) या चार ग्रामीण रुग्णालयांत आणि नेकनूरच्या (ता. बीड) स्त्री रुग्णालयात कोविड उपचाराचे काम शून्य झाले. म्हणजे आडोशांच्या ठिकाणी पोस्टींग किंवा प्रतिनियुक्त्या घेऊन ही मंडळी कोविड पासून चार हात दूरचं राहिली. विशेष म्हणजे यातील काही अधिकाऱ्यांच्या वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नेमणुका आहेत.

तीन सीएस पण स्थिती जैसे थे-
तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या काळात कोरोनाची पहिली लाट आली. त्यांच्या काळातही वरील ग्रामीण व स्त्री रुग्णालयांनी कोविड उपचारात काहीच योगदान दिले नाही. नंतर डॉ. सूर्यकांत गित्ते जिल्हा शल्यचिकित्सक असताना दुसरी लाट आणि आणि त्याचा कहर मोठा असतानाही या रुग्णालयांतील मंडळी चार हात दूरचं होती. आता डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आल्यानंतर प्रशासनाने कोरोना तपासण्या वाढविण्याचे लक्ष्य समोर ठेवले. साधे तपासण्यांतही यांचे हात बांधलेलेच आहेत. त्यामुळे डॉ. साबळेंच्या नुसत्या भेटी - गाठी आणि सूचनांचे आऊटपुट काय? असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे कोविड उपाय योजनांत योगदान नसताना या मंडळींनी शस्त्रक्रियागृहांचे कुलूपही बंदच ठेवले. म्हणजे अख्खं प्रशासन झटत असताना ही मंडळी चार हात दूरचं होती.

doctor
Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत ३६५ जणांना कोरोनाची बाधा

- कोरोनाचे शून्य काम; कोरोना तपासणीतही मागेच
- पाच रुग्णालयांत शून्य तपासण्या
- आठ रुग्णालयांच्या तपासण्या दहाच्या खाली
- दोन सीएसच्या काळात कोरोनाचे काम नाही
- नव्या सीएसच्या काळात तपासण्याही नाहीत
- एका पीएचसीच्या चाचण्या सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांएवढ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com