
मराठवाडा : राजकीय उलथापालथ झाल्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपापल्या पक्षाचे जोमाने काम केले. त्यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध कार्यकर्त्यांना लागले आहेत. केव्हा एकदाची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भूम तालुक्यातील सर्वच पक्ष स्वतंत्र किंवा महाविकास आघाडी, तर महायुतीप्रमाणे पंचायत समिती व जिल्हा परिषदसाठी तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.