नळजोडणी दर कमी करण्यासाठी सरसावले सर्वच पक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

परभणी ः नवीन नळ जोडणी दराबाबत दिलासादायक निर्णय घेण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी (ता.१४) महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहर महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली गटनेत्या मंगला मुदगलकर, अन्य नगरसेवक पदाधिकारी यांनी शुक्रवारी आयुक्त रमेश पवार यांच्याशी दराबाबत चर्चा करून निवेदन दिले.

परभणी ः नवीन नळ जोडणी दराबाबत दिलासादायक निर्णय घेण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी (ता.१४) महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहर महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली गटनेत्या मंगला मुदगलकर, अन्य नगरसेवक पदाधिकारी यांनी शुक्रवारी आयुक्त रमेश पवार यांच्याशी दराबाबत चर्चा करून निवेदन दिले.

शहरात १९९६ पासून सुरु झालेली योजना आत्ता पूर्ण झाली असून त्यामुळे टॅंकरवर होणारा कोट्यवधींचा खर्च वाचणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जो ठराव मंजुर झाला होता, तो येणाऱ्या सभेत निश्चित होऊन कार्यवाही होईल. त्या ठरावातील दराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 

योजना तत्काळ सुरु होणे गरजेचे
शहर हे सेवानवृत्तांचे असून शहराची आर्थिकस्थिती अन्य शहरांच्या तुलनेत खुप कमी आहे. रस्त्याच्या अलीकडील बाजूकडून जोडणी देण्यासाठी रोड खोदण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे त्यासाठीचा तीन साडेतीन हजार रुपये खर्च कमी होईल. आत्तापर्यंत मनपाने नळजोडणी देतांना रस्ता खोदकामाचे तीन हजार रुपये नळधारकांकडून घेतले. परंतु, कुठल्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. उन्हाळा लवकरच सुरु होणार असून त्यामुळे योजना तत्काळ सुरु होणे गरजेचे आहे.

वॉटर मिटर पुढील टप्प्यात बसवा
वॉटर मिटर अन्य मोठ्या शहरात सुध्दा लावलेले नाहीत. मग येथे त्याचा घाट का ? असा प्रश्न उपस्थित करून ते पुढील टप्प्यात बसवले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पुर्वीची अनामत रक्कम वर्ग करण्यात यावी, अनधिकृत नळधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील भाजपाने केली आहे. या वेळी नगरसेवक अशोक डहाळे, नंदकिशोर दरक, मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे, रितेश जैन, प्रशांत सांगळे, चंद्रकांत डहाळे, रामदास पवार, विशाल बोबडे, पुनम शर्मा आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - नळजोडणी दराबाबत फेरविचार करा : विभागीय आयुक्त केंद्रेकर

कॉँग्रेसचे अंबिलवादे यांची मागणी
कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन अंबिलवादे यांनी देखील शुक्रवारी (ता.१४) आयुक्तांना निवेदन दिले. नळजोडणी शुल्काबाबत नाराजीचा सुर असून लावलेले शुल्क खुप जास्त आहे. त्यामुळे दर कमी करण्याबाबत विचार करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. श्री. अंबिलवादे यांनी नळजोडणीसाठी स्वतः शुल्क निश्चित केलेले असून अनामत रक्कमेसह पाच हजार ६७० रुपये नळजोडणी शुल्क आकारावे अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - ‘व्हॅलेटाईन डे स्पेशल’ : ‘अशू-मशू’ची यशस्वी प्रेम कहाणी...

आमदार पाटील यांची आयुक्तांशी चर्चा
आमदार डॉ. राहुल पाटील यांनी देखील गुरुवारी (ता.१३) सायंकाळी आयुक्त रमेश पवार यांची भेट घेऊन नळजोडणी दराबाबत चर्चा केली. नळजोडणी शुल्क कमीत कमी करून नागरिकांना लवकरात लवकर पाणी देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार, नवनित पाचपोर, विश्वास कऱ्हाळे, नगरसेवक सुशिल कांबळे आदींची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All parties have moved to reduce the tilt rate