- हबीबबान पठाण
पाचोड - वडजी (ता. पैठण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय गणवेषात शिक्षकाकडून थेट सरपंचाच्या नावाखाली मागण्यात आलेल्या कमीशन (टक्केवारी) च्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच मंगळवारी (ता. आठ) चौकशी करण्यासाठी गेलेले पथक चौकशी न करता रिकाम्या हाताने परतल्याने त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची घटना घडली. यावेळी सरपंच भाऊसाहेब गोजरे यांनी प्रभारी गट शिक्षणाधिकरी श्रीराम केदार यांचेकडे संबंधिताविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी लेखी निवेदन दिले.