जिवनावश्यक वस्तूंच्या सहाशे किटचे वाटप

NND07KJP03.jpg
NND07KJP03.jpg

नांदेड : लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्यांच्या वसाहतींमध्ये कामगार, मजुरांना त्यांच्या पालावर जाऊन लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनच्यावतीने जीवनावश्यक वस्तू असलेल्या तीन लाख तीस हजार रुपये किंमतीच्या सहाशे किटचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागात वाटप
परप्रांतीय, गरजू तसेच पालावर राहणाऱ्या कामगार, रेशनकार्ड नसलेले व्यक्तींना शहरातील श्रावस्तीनगर, जवाहरनगर आदी भागात तसेच ग्रामीण भागातील वानेगाव, धनेगाव, वाजेगाव आदी भागातील सहाशे कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले.

लॉयन्स क्लबची संकल्पना
लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष योगेशकुमार जैस्वाल, सचिव अमरसिंग चौहाण, कोषाध्यक्ष नितीन लाठकर, प्रकल्प संचालक प्रेमकुमार फिरवाणी यांच्या संकल्पनेतून सहाशे कुटुंबांचा किमान आठवडाभर तरी प्रश्न मिटावा यासाठी नियोजन करून अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आले. 

हेही वाचलेच पाहिजे....यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत

लॉयन्स सदस्यांसह शहरातील दात्यांनी दिले योगदान
लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनच्या या कार्यात लॉयन्स सदस्यांसह शहरातील दात्यांनी योगदान दिले. लाॅकडाउनच्या काळात गेल्या सहा दिवसांपासून लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे सदस्य या कार्यात अविरत कार्य करीत आहेत. यासर्व मदत किटसाठीचे साहीत्य बन्सल किराणा यांनी रास्त भावात पुरविले. कवठा परिसरात संत निरंकारी भवन येथे एकत्र करून वाटपासाठी किट तयार करुन देण्यात आल्या.

यांनी दिले योगदान
यात डी .पी. सावंत- ५०, योगेश जायसवाल-५०, नितीन लाठकर- २१, जयेश ठक्कर- १०, प्रवीण अग्रवाल- २०, डॉ. देवसरकर- ५०, राजेंद्र हुरणे- २५, प्रदीप चाडावार- २०, सचिन मानधने- १५, डी. डी. महाजन- १०, नितीन माहेशवरी- १०, सतीश सामते- १०, शिरीष कासलीवाल- १०, आनंदी देशमुख- १०, कमल कोठारी- १०, सतीश शिरुरकर- १०, रवी शामराज- १०, सुधाकर चौधरी- १०, रवी कडगे- १०, संदीप- १०, अँड. निरणे- १०, ज्ञानेश्वर थेटे-१०, गंगाप्रसाद तोष्णीवाल- १०, गणेश चांडक- १०, जयप्रकाश काबरा- १०, भगवान मानधने- १०, कौस्तुभ फरांदे- १०, मुकेश अग्रवाल- १०, अशोक पाटणी- ५, राजेश बियाणी- ५, धनंजय डोईफोडे- ५, अशोक कासलीवाल- ५, नरेश व्होरा- ५, मधुसुदन गुप्ता- ५, इंदरसेठ खियाणी- ५, अक्षय बंग- ५, डॉ. दागडीया- ५, सोनु कंलत्री- ५, लता मीरजकर- ५, गिरीश ठक्कर-५, सुभाष कासलीवाल- ५, सरताज सिंग- ५, विजय घई- ५, प्रवीण दुधमाडे- ५, सुबोध- ५, साई रिसणगावकर- ५, संजय पाटणी- ५, शरद मोगडपलली- ४, विश्वजीत राठोड- ५, डॉ. यशवंत चव्हाण- ५. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com