

Compassion in Summer: School Students in Amalner Vasti Hang Water Pots for Birds
Sakal
कायगाव : उन्हाच्या तडाख्याने माणसांसोबतच मुक्या पक्ष्यांचेही हाल होत आहेत. अशावेळी गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिमणी पाखरांसाठी शाळेतील अनेक झाडांवर माती,प्लास्टिक च्या भांड्यात दाणापाण्याची सोय करून शुक्रवारी( ता.१) पासून राबवलेला उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.