अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 21) रात्री नऊ वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह, ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह बेमोसमी पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे..भर पावसाळ्याप्रमाणे पावसाने हजेरी लावली. समस्त महाजन ट्रस्ट च्या वतीने लोकसहभागातून खोदलेल्या अंबड परिवारातील शेतशिवारातील ओढा रात्रीच पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. जोरदार पावसामुळे विहीर, कूपनलिकाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे..अंबड शहरासह लालवाडी, पारनेर, शिरनेर, मार्डी, डावरगाव, भिवंडी बोडखा,मठजळगाव, नांदी, किनगाव, चांदमियाचीवाडी,धनगरपिंपळगाव, हस्तपोखरी,आलमगाव, चांभारवाडी, साडेसावंगी, हनुमाननगर,नागझरी, मठपिंपळगाव, धनगरपिंपरी, शेवगा, हारतखेडा,सारंगपुर, काटखेडा, बठाण, वाघलखेडासह आदी ठिकाणी पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे..शेतशिवारात पाण्याचे पाट साचले आहे. पाझर तलाव, खदानीमध्ये पाणी साचल्याने शेतकरी, पशुपालक यांना आपल्या पशुधनाची तहान भागविण्यासाठी काही काळ दिलासा मिळाला आहे. शेतकरी आता उन्हाळी मशागतीच्या कामात मग्न आहे. बियाणे, खत,औषधी खरेदी करण्यासाठी अर्थिक तजवीज करत आहे..जलसाठा वाढण्यास झाली मदतअंबड शहर व परिसरात सलग दोन ते तीन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कूपनलिका, विहिरी यांची पाणी पातळी वाढण्यास तर कोरड्या पडलेल्या साठवण तलाव,पाझर तलावात पाणी चमकत आहे. यामुळे हा जलसाठा शेतकरी, पशुपालक यांच्यासाठी वरदान ठरत आहे. पशू,पक्षी यांच्यासाठी तहान भागविण्यासाठी तात्पुरता दिलासा मिळाला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.