
प्रत्येक प्रभागांतून केवळ सात फॉर्म निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. यामुळे आता केवळ औपचारिकता म्हणून बिनविरोधची केवळ घोषणा होणे बाकी आहे.
अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील निहालसिंगवाडी येथील तीन प्रभागातून सात सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. त्यातच निहालसिंगवाडी प्रत्येक प्रभागांतून केवळ सात फॉर्म निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. यामुळे आता केवळ औपचारिकता म्हणून बिनविरोधची केवळ घोषणा होणे बाकी आहे.
निहालसिंगवाडी ही तालुक्यातील तिसरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. चांभारवाडी, देशगव्हान या दोन गावच्या ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील निहालसिंगवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील राजकारणातील गट- तट बाजूला ठेवत एक दिलाने व विचार विनीमयाने केवळ सात जणांचे अर्ज दाखल केले. यामुळे ग्रामस्थांनी निवडणूक न घेता ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.
गावच्या विकासासाठी केली ग्रामपंचायत बिनविरोध:
गावचा सर्वांगीण विकास व्हावा, हा उद्देश डोळ्या समोर ठेवला आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सात नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. यामध्ये कचरू हिरालाल बहुरे, रामरतन धनसिंग बमनावत, अनिता प्रताप काकरवाल, लताबाई चैनसिंग सिंगल, सज्जन सिताराम बमनावत, निर्मला गोविंद नाऱ्हेडा, आश्विनी संतोष बमनावत या चार सात जणांचे केवळ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
(edited by- pramod sarawale)