

Residents have urged the municipal administration to identify the owners of stray cattle and take immediate action to ensure public safety.
Sakal
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात मोकाट जनावरे, भटकंती करणारी कुत्रे, डुकरे यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. शहरातील जालना -बिड महामार्गावरील पाचोड नाका, नाट्यगृह, तहसिल कार्यालय, श्री स्वामी समर्थ मंदिर,बसस्थानक, आंबेडकर पुतळा, महावीर चौक, मोंढा,पंचायत समिती, मत्स्योदरी देवी मंदीर, घनसावंगी फाटा दरम्यान महामार्गावर मोकाट जनावरांचा संचार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या पाहण्यासाठी मिळत आहे.यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत आहे. अनेकदा छोटे -मोठे अपघात घडत आहे. महामार्गावर मोकाट जनावरे वाहतुकीला दिवसरात्र अडथळा करत असल्याने वाहन चालक, विद्यार्थी,महिला यांना महामार्गावरून ये जा करताना अक्षरशः जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे.