
Ambad Accident
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड -जालना महामार्गावरील लालवाडी फाट्याजवळ शनिवारी (ता.18) सकाळी साडे नऊ वाजता मंठा तालुक्यातील गेवराई येथील गोविंद लक्ष्मण गिऱ्हे (वय 20) वर्ष हा तरुण जालना शहराकडून अंबडकडे जात असताना अंबडकडून जालना शहराकडे जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला महामार्गावरून खाली खड्यात फरफटत घेऊन जात चिरडले आहे.