
Mini Mantralaya
Sakal
अंबड : जिल्हा परीषदेची ओळख म्हणजे मिनी मंत्रालय होय.मिनी मंत्रालयात निवडून येणाऱ्या व अध्यक्ष म्हणुन झेडपीत खुर्चीवर बसणाऱ्याला उपमंत्र्याचा दर्जा प्राप्त होत असल्याने लाल दिव्याची गाडी बसायला मिळते. ग्रामीण भागातील विकासात्मक कामासाठी भरघोस निधी मिळतो. यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परीषद गट व पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीला उभा राहण्यासाठी निवडणूक घोषीत होण्यापूर्वीच अनेकांनी लगीन घाई सुरू केली आहे. सर्वच पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते निवडणुकीला उभा राहण्यासाठी अनेकांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.