
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील जालना - बिड महामार्गावरील सुखापूरी फाट्यावर आमदार बच्चु कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्याच्या कर्जमाफीसह आदी मागण्यासाठी गुरूवारी (ता.24) सकाळी साडे नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जालना - बिड महामार्गावर दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्याने जवळपास दोन ते अडीच तास वाहतूक व्यवस्था खोळंबळी होती. शेतकऱ्यानी महामार्गावर बैलगाड्या आणून रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. मा.आमदार श्री बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सुखापुरी फाटा येथे चक्काजाम आंदोलन सुखापुरी परिसरातील सर्व शेतकरी बांधव महिला भगिनी विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.रस्ता रोको आंदोलनात