esakal | Ambad Rain: अंबड तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो
sakal

बोलून बातमी शोधा

अंबड पाऊस

अंबड तालुक्यात अनेक ठिकाणी ओढे, नाले, नद्या आता तुडूंब भरून खळखळ पाण्याने वाहत आहेत

Ambad Rain: अंबड तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जालना): अंबड तालुक्यात पावसाने दोन ते दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील सिंचन प्रकल्प पाण्याने ओव्हरफ्लो झाले आहेत. शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकांत पाण्याचे पाट साचले आहे. यामुळे खरिपाची पिके आता हातची गेल्यातच जमा आहे. जोमात आलेली पिके नैसर्गिक आपत्ती, रोगराई यामुळे अखेर कोमात गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास अखेर हिरावून घेतला जात आहे. अंबड तालुक्यात अनेक ठिकाणी ओढे, नाले, नद्या आता तुडूंब भरून खळखळ पाण्याने वाहत आहेत. यामुळे विहीरी, कूपनलिका यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अंबड तालुक्यातील गल्हाटी नदीला जोरदार पावसाने पुर आला आहे. यामुळे गल्हाटी प्रकल्प तसेच धनगरपिंपरी पाझर तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक यांनी रविवारी सकाळ पासूनच गर्दी केली होती. तालुक्यात पडलेल्या पावसाची मंडळ निहाय नोंद: अंबड 120 मि. मी., वडीगोद्री 175 मि.मी., जामखेड 137 मि.मी., सुखापुरी 123 मि.मी., धनगरपिंपरी 63 मि.मी., रोहिलागड 118 मि.मी., गोंदी मंडळात 123 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील वडीगोद्री या मंडळात सर्वात जास्त म्हणजे 175 मी.मी. तर त्या खालोखाल जामखेड मंडळात 137 मि.मी.पाऊस पडला आहे.

हेही वाचा: भोकरदन तालुक्यात बारा तासांपासून पावसाची रिपरिप सुरू

तालुक्यात दिवसरात्र पाऊस सुरूच असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. आता शेतकऱ्याच्या उभ्या पिकांत पाण्याचे पाट साचल्याने पिकं पिवळी, लाल, काळी पडुन खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेला आहे. नुकसान भरपाईचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून जोर धरत आहे.

loading image
go to top