

Heavy rainfall disrupted the weekly vegetable market in Ambad, Jalna district, causing large-scale damage to vegetables and a sharp fall in prices.
Sakal
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गुरूवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरणाबरोबर दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती. यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. पावसामुळे आठवडी बाजारात चिखलामुळे भाजीपाला विक्री करताना शेतकरी व विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली होती. अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी ताडपत्री व मेनकापड याचा वापर केला. तर अनेकांनी भरपावसात बसून भाजीपाल्याची विक्री केली.