- संतोष निकम
कन्नड - कन्नड शहराची व शहराच्या आजुबाजुला असणाऱ्या ११ गावाची तहान भागविणा-या अंबाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे अंबाडी मध्यम प्रकल्प मंगळवारी (ता. १९) रोजी सकाळी तुडुंब भरला आहे. शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी अंबाडी हा प्रकल्प जीवनदायिनी आहे.