Ashadhi Wari 2025 : ‘माउलीं’ च्या नामघोषात अंबाजोगाईत अश्वरिंगण
Warkari Tradition: ‘माउली, माउली, नामदेव, जनाबाई’ या संत नामाच्या जयघोषात गुरुवारी येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर एकाच वेळी तीन अश्व रिंगणात धावले.
अंबाजोगाई: ‘माउली, माउली, नामदेव, जनाबाई’ या संत नामाच्या जयघोषात गुरुवारी (ता. २६) येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर एकाच वेळी तीन अश्व रिंगणात धावले. हा अनुपम्य सोहळा अनुभवताना उपस्थित भाविक दंग झाले होते.