Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Current Status of Ambulance Fuel Supply: जालना जिल्ह्यात रुग्णवाहिकांचा डिझेल पुरवठा सध्या सुरळीत असून, पेट्रोल पंपधारकांनी क्रेडिटवर इंधन बंद केल्यामुळे येत्या काही दिवसांत अडचण निर्माण होऊ शकते.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: युद्धाच्या परिस्थितीमुळे इंधनाचा प्रश्न बिकट झाला असून पेट्रोल पंपधारकांनाही आता क्रेडिटवर इंधन मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे रोख पैसे भरल्यानंतरच पेट्रोल पंपधारकांना इंधन उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासनाच्या वाहनांना मिळणाऱ्या उधारीवरच्या इंधनावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील ६८ रुग्णवाहिकांचा डिझेल पुरवठा सध्या सुरळीत सुरू असला तरी कालांतराने तो खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, रुग्णवाहिका डिझेल अभावी बंद राहू नये, याची दक्षता जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com