esakal | अमित देशमुख सांस्कृतिक धोरण मार्गी लावणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

विलासराव हे सांस्कृतिक मंत्री असताना आणि मुख्यमंत्री असतानाही त्यांचे या खात्याकडे विशेष लक्ष असायचे. सांस्कृतिक धोरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

अमित देशमुख सांस्कृतिक धोरण मार्गी लावणार का?

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तयार झालेले सांस्कृतिक धोरण मागील सरकारच्या दुर्लक्षामुळे अजूनही पूर्णपणे अंमलात आले नाही. आता विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांच्याकडे सांस्कृतिक खात्याची धुरा आल्याने ते वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार का आणि सांस्कृतिक धोरण मार्गी लावणार का, याची उत्सुकता सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याच्या जबाबदारी आली आहे. त्यामुळे सांस्कृतिक धोरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

सांस्कृतिक धोरणाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले, अशी टीकाही गेल्या काही वर्षांत वारंवार झाली. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ साहित्यिक आणि सांस्कृतिक धोरण समिटीचे अध्यक्ष आ. ह. साळुंखे म्हणाले, ''विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आमच्या समितीने कष्टपूर्वक सांस्कृतिक धोरण तयार केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विविध अंगाने अभ्यास केला. महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशांना, सामाजिक स्तरांना विकासाच्या संधी कशा मिळतील, हे पाहिले. यातील काहीच गोष्टी अमलात आल्या. नव्या सरकारने याकडे गांभीर्याने पहावे, असे माझे मत आहे.''

हेही वाचा :  अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका : चंद्रकांत खैरे : Video

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, ''विलासराव हे सांस्कृतिक मंत्री असताना आणि मुख्यमंत्री असतानाही त्यांचे या खात्याकडे विशेष लक्ष असायचे. भौतिक विकास आणि सांस्कृतिक विकास, हे विकासाचे दोन डोळे आहेत. हे दोन्ही डोळे तेजस्वी असायला हवेत. यापैकी एक डोळा आंधळा असेल, तर बाकीच्या विकासाला अर्थ नाही, असे विलासराव नेहमी सांगायचे. सांस्कृतिक धोरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पण दुर्दैवाने मागच्या सरकारने ते बासनात गुंडाळले. पण हे धोरण या सरकारने आणि अमित यांनी पुन्हा पुढे आणावे, असे मला वाटते.''

हेही वाचा : त्यांना थेट मुख्यमंत्रीच व्हायचंय?

विलासरावांनी ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कार, प्रभाकर पणशीकर पुरस्कार, अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत नाटक पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार असे कितीतरी महत्वाचे पुरस्कार सुरू केले. केवळ पुरस्कार नव्हे, तर साहित्य, संगीत, लोकनाट्य अशा क्षेत्रातील संस्थांना मदतीचा हात दिला.

विश्वकोशाचे कामही त्यांच्याच काळात सुरू झाले. कलावंत, साहित्यिकांचा त्यांनी कायम आदर राखला, अशा आठवणींना पवार यांनी उजाळा दिला. अशीच चमकदार कामगिरी अमितही करतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी त्यांच्या वडिलांसोबत होतो. आता त्यांच्यासोबत असेन, असेही ते म्हणाले.

loading image