esakal | आनंदवार्ता : परभणी जिल्ह्यातील ८२ पैकी २४ कोरोना मुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आजच्या अहवालात जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असून 24 कोरोना बाधित रूग्णांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तसेच त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयातून सुट्टी देवून घरी सोडण्यात आले आहे.

आनंदवार्ता : परभणी जिल्ह्यातील ८२ पैकी २४ कोरोना मुक्त

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : परभणी जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील ८२ पैकी २४ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. या २४ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता.एक) रात्री दिली.

परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने रोजच जिल्हा वासीयांच्या नजरा या अहवालाकडे लागलेल्या असतात. आजच्या अहवालात जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असून २४ कोरोना बाधित रूग्णांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तसेच त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयातून सुट्टी देवून घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा - पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू
 

तसेच आज नवीन एकही रुग्ण न वाढल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तसेच या अहवालानूसार २३८ प्रलंबित तर ७० अनिर्णायक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात १ जून रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत एकूण १४ संशयीतांचे स्वॅब पाठवण्यात आले असून संशयितांची संख्या २३४४ पर्यंत पोचली आहे.

एकूण २३४४ पैकी २०८० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ८२ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ७० संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. ३१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण २३८ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.

हे देखील वाचाच - Video : बाजारपेठ पूर्ववत सुरू; खरेदीसाठी उडाली झुंबड

परभणीत सोमवारी ४ जण पॉझिटिव्ह

परभणी : जिल्ह्यात सोमवारी (ता.एक) २४ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचा आनंद होत असतानाच रात्री उशिरा आलेल्या अहवालात ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात मानवत तालुक्यातील ३ तर जिंतूर तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या ८७ झाली आहे. 

कोरोना मीटर

  • एकूण रुग्ण ८६
  • बरे झालेले २५
  • उपचार सुरू ५९
  • मृत्यू २