

Latur News
esakal
देवणी: उसात आंतरपीक म्हणून घेतलेला बटाटा फायदेशीर ठरला. दोन एकरांत अडीचशे क्विंटल उत्पादनही मिळाले. अनंतवाडीचे शेतकरी सोमवंशी यांची प्रयोगशीलता अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुलगा राजकुमारच्या मदतीने सीमावर्ती भागात घरोघरी बटाट्याची विक्री केली.
देवणी तालुक्यातील अनंतवाडी येथील अंतेश्वर सोमवंशी अल्पभूधारक शेतकरी. अनंतवाडी साठवण तलावावरून पाइपलाइन केल्याने गेल्या दीड दशकात सिंचनाखाली शेतजमीन आली. साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यांनी यावर्षी चार एकर ऊस लागवड केली. त्यातील दोन एकर उसात आंतरपीक म्हणून बटाट्याचे पीक घेतले.