esakal | संत बाबा नरेंद्रसिंघ, संत बाबा बलविंदरसिंग यांची लंगरसेवा 
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

लंगर साहिब गुरुद्वाराने पुढाकार घेतला. शहरासह परिसरातील गरजवंताना लंगरची सेवा (अन्नदान) मोफत सुरू आहे. सरासरी चार लाख नागरिक या अन्नदानाचा लाभ घेत आहेत. 

संत बाबा नरेंद्रसिंघ, संत बाबा बलविंदरसिंग यांची लंगरसेवा 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या  लढ्यात येथील लंगर साहिब गुरुद्वाराने पुढाकार घेतला. शहरासह परिसरातील गरजवंताना लंगरची सेवा (अन्नदान) मोफत सुरू आहे. सरासरी चार लाख नागरिक या अन्नदानाचा लाभ घेत आहेत. 

कोरोना आपत्तीमुळे लॉकडाउन परिस्थितीत नागरिकांना खाण्या- पिण्याच्या वस्तूंसाठी लोकांची चांगलीच पंचायत होत आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जतेथार संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बालविंदर सिंघ यांनी नेहमीप्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून मागिल आठ- दहा दिवसांपासून लंगर सेवा सुरु केली आहे. काल आंबेडकरनगरमध्ये संत बाबा नरेंद्रसिंघ यांनी स्वतः लंगर वाटप केले. भन्ते पैया बोधी, नगरसेवक संदिप सोनकांबळे यांची यावेळी उपस्थिती होती. 

हेही वाचाश्री रेणुकादेवी संस्थानतर्फे अकरा लक्ष रुपयांची मदत

संकटातून देश सहीसलामत बाहेर पडावा

गुरुद्वारा लंगर साहिब कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यानंतर सर्वतोपरी मदतीला धावून नांदेडकरांची सेवा करत आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या संकटातून देश सहीसलामत बाहेर पडावा व जनता जनार्दनाचे कल्याण व्हावे यासाठी लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सहा अखंड पाठ करण्यात आले. लंगर साहिब गुरुद्वाराच्या महाराष्ट्र राज्यात नांदेडसह मनमाड, शहापूर, चांदवड, देगलूर, कारेगाव, लोहा येथील संस्थानच्या मार्फत अन्नदान लंगर वाटप करण्यात येत आहे. दररोज सरासरी साडे तीन ते चार लाख नागरिकांना ही सेवा उपलब्ध केली जात आहे. 

कारसेवाकडून देशभर लंगर वाटप

नांदेड भूषण संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणात देशात कारसेवा सुरू असून या सेवेच्या माध्यमातून पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये ही या राष्ट्रीय आपत्ती दरम्यान लंगरची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. सुमारे चार लाख लोकांपर्यंत कार सेवेची ही मदत पोहचत आहे. नवीन कौठा, मालटेकडी, विष्णुपुरी, कारेगाव, खानापूर- देगलूर, मनमाड, शहापूर, चांदवड येथे तसेच नांदेड शहरातील ठीक- ठीकाणी जेवण वाटप केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कार सेवेच्या या मानवतावादी कार्याचे कौतूक केले आहे.