esakal | श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे अकरा लक्ष रुपयांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

mahrur.jpg


बुधवारी (ता. आठ) माहूर तहसील कार्यालयात संस्थानचे सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी पंतप्रधान केअर फंडाकरिता अकरा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे, महसूल कर्मचारी संतोष पवार उपस्थित होते.

श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे अकरा लक्ष रुपयांची मदत

sakal_logo
By
बालाजी कोंडे


माहूर, (जि.नांदेड) ः माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थानने पंतप्रधान केअर फंडासाठी बुधवारी (ता. आठ) अकरा लक्ष रुपयांची मदत दिली आहे. देशात व राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोना उपायांसंबधी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.


महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेले माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थान सदैव सामाजिक कार्यात, नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी तत्पर असते. श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया, संस्थानचे सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त विनायकराव फादांडे, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त दुर्गादास भोपी, विश्वस्त आशिष जोशी व विश्वस्त मंडळाने निर्णय घेऊन देशात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांकरिता पंतप्रधान केअर फंडाकरिता अकरा लक्ष रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे एकमत केले.

नागरिकांत समाधान
बुधवारी (ता. आठ) माहूर तहसील कार्यालयात संस्थानचे सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी पंतप्रधान केअर फंडाकरिता अकरा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे, महसूल कर्मचारी संतोष पवार उपस्थित होते. श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे लॉकडाउनमध्ये माहूर तालुक्यात शंभर कुटुंब, तर किनवट तालुक्यातील दीडशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य असलेल्या किट अडीचशे कुटुंबांना वाटप करण्यात आले आहे. श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त मंडळ नेहमीच पुढाकार घेऊन वेळोवेळी मदतीसाठी पुढे येत असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -  नांदेडला गल्लीबोळातील रस्तेही लॉकडाऊन


सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बुधवारी (ता. आठ) दुपारी शासकीय ग्रामीण रुग्णालयात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांकरिता सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. या वेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, मुख्याधिकारी विद्या कदम, अधीक्षक वैजनाथ स्वामी, पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख उपस्थित होते.

loading image