अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहरातील नारायण मंदिर शेजारी असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी खोदकाम चालू आहे. हे खोदकाम करत असताना जुन्या मंदिराचे बांधकाम आढळून आले आहे.
शहरात याची एकच चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी याठीकाणी गर्दी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगी परगणा असलेल्या शहरात जुने तहसील कार्यालय इमारत ही चार बुरुजाची इमारत होती. होळकर कालखंडात तिथे कमावीसदार बसत असे.
पुढे निजाम होळकर तहानंतर अंबड कचेरीत निजाम तहसीलदार कारभार करीत असे. तेव्हापासून या इमारतीची ओळख तहसील कार्यालय अशी झालेली आहे. इमारतीचे तीन बुरुज नष्ट झाले आहे. लगत मंत्री यांच्या घरासमोर असलेला व ओझा यांच्या घराशेजारी असलेला बुरुज अखेरच्या घटका मोजीत आहे. नुकतेच जुने तहसील कार्यालय पाडून त्याठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची नुतन वास्तू बांधकाम कऱण्यात आलेले आहे.
यासाठी संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी पायाचे खोदत असताना दहा फुट रुंदीची व आठ दहा फुट उंचीची भिंत आढळली आहे. शेजारी नारायण मंदिर भिंत असुन जुन्या बांधकामाचा भाग मोकळा करुन त्याचे परिक्षण करणे आवश्यक आहे. जुन्या जाणत्या लोकांकडून सदरील जागा मंदिराची असल्याचे बोलले जात आहे. आजुबाजुला विखुरलेले मंदिर अवशेष दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.