Anganwadi Protest: महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर वाढत्या कामाचा ताण असून, ‘लाडकी बहीण’ योजनेचे फेरसर्वेक्षण अंगणवाडी ताईंवर लादू नये, अशी मागणी करून नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
बीड : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर सरकारकडून टाकण्यात येणाऱ्या वाढत्या कामाच्या ताणाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.