esakal | जनावरे चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परळी तालुक्यातील आखाड्यावरून जनावरे चोरून नेणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीस गंगाखेड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड व परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरे चोरी केल्याचे उघड झाले.

जनावरे चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ (जि.परभणी) : बीड, परभणी जिल्ह्यात जनावरे चोरून कत्तल खाण्यात नेणारे अट्टल गुन्हेगार शनिवारी (ता.१५) बीड पोलिसांकडून सोनपेठ पोलिसांच्या ताब्यात आली. तालुक्यात झालेल्या जनावरे चोरीचा उलगडा यामुळे होणार आहे.

परळी तालुक्यातील आखाड्यावरून जनावरे चोरून नेणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीस गंगाखेड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड व परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरे चोरी केल्याचे उघड झाले. सोनपेठ तालुक्यातील नरवाडी शिवारात चोरट्यानी म्हैस व बैलांची चोरी केली होती. त्या प्रकरणात सोनपेठ पोलिसांनी शेख महमूद शेख फरीद (रा. पांगरी ता. गंगाखेड), जीलानी खाजामिया कुरेशी (रा. राणीसावरगाव), ग्यानू महपती पवार (रा. कोठाळा ता. सोनपेठ), शिवाजी महपती पवार (रा. कोठाळा), बाल्या उर्फ बालाजी पंडित काळे (रा. कौडगाव घोडा ता. परळी) या आरोपींना बीड येथून ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा - त्याने तिला टहाळ खायला बोलावले अन्...


आंतरराज्यीय टोळ्यात काम करणारे गुन्हेगार
यातील अनेक गुन्हेगार हे आंतरराज्यीय टोळ्यात काम करणारे असून त्यांना इतर राज्यातील पोलिसांनीदेखील अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी झाल्यास अनेक गुन्ह्यांचा उलगडा होऊ शकतो. या प्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आडे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा...

सव्वा लाख घेऊन महिला बेपत्ता
परभणी : शहरातील साखलाप्लॉटमध्ये राहणारी ३८ वर्षीय महिला दहा ते बारा साड्यांसह एक लाख ३० हजार रुपये घेऊन गेली असल्याची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीने दिली आहे. पाच फुट उंच, रंग सावळा, निळ्या रंगाची साडी परीधान केलेली महिला कोणास आढळल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.
मागील ११ तारखेपासून महिला घरातून निघून गेली असून तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, सापडली नाही. सोबत साड्या व एक लाख ३० हजार रुपये नेल्याचे म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही.एस. अरसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. जंत्रे अधिक तपास करत आहेत.
....

loading image