esakal | त्याने तिला टहाळ खायला बोलावले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कुंडी (ता.सेलू) येथे गुरूवारी (ता.१३) सायंकाळी सहाच्या सुमारास गावातीलच अशोक भगवान बालटकर (वय २५) या युवकाने घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका आठ वर्षीय बालिकेला हरबऱ्याचा टहाळ देतो, अशी फूस लावून पळवून नेले होते. बराच वेळ झाला तरीही बालिका घरात, अंगणात व परिसरात दिसत नसल्याने  पालकांनी शोधा शोध सुरू केला.

त्याने तिला टहाळ खायला बोलावले अन्...

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : एका आठ वर्षीय बालिकेला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कुंडी (ता.सेलू, जि.परभणी) शिवारात घडली. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द पॉस्को कायद्याअंतर्गत शनिवारी (ता.१५) अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलू पोलिसांनी घटनेतील आरोपीला शनिवारी मध्यरात्री अटक केली.

 कुंडी (ता.सेलू) येथे गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावातीलच अशोक भगवान बालटकर (वय २५) या युवकाने घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका आठ वर्षीय बालिकेला हरबऱ्याचा टहाळ देतो, अशी फूस लावून पळवून नेले होते. बराच वेळ झाला तरीही बालिका घरात, अंगणात व परिसरात दिसत नसल्याने  पालकांनी शोधा शोध सुरू केला. नेहमीच बालिकेच्या घराकडे येत असलेला आरोपी अशोक याच्यासोबत बालिका दिसल्याचे काही ग्रामस्थांनी बालिकेच्या पालकांना सांगितले.  त्यानंतर बालिकेच्या वडीलांनी सेलू पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी विरूध्द फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

  हेही वाचा - परीक्षेत पास करतो म्हणून तिला बसविले वर्गात एकटिलाच...

बालिका शेतात आढळली
 शुक्रवारी (ता.१४) सकाळी पालकांनी आरोपीच्या शेतात जावून शोध घेतला असता बालिका त्याच्या शेतात आढळून आली. पालकांना पाहताच आरोपी अशोक याने तेथून पळ काढला. बालिकेची पोलिसांनी विचारपूस करून वैद्यकीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी वैद्यकीय तपासणीचा अहवाल येताच आरोपी अशोक बालटकर याच्या विरूद्ध पोस्को कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

  हेही वाचा -  रेल्वे लाईन दुहेरी करणाचे काम पूर्णत्वास

आरोपीला शनिवारी मध्यरात्री अटक  
दरम्यान, आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना केली. सेलू पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरविली असता आरोपी रेणापूर (ता.पाथरी, जि.परभणी) येथे त्याच्या मावशीकडे लपल्याची माहिती मिळताच शनिवारी सेलू पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मध्यरात्री रेणापूर येथून अटक केली. पोलिस उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
 

loading image