सोनपेठच्या तहसिलदाराला लाच घेताना पकडले, एसीबीची मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनपेठचे तहसीलदार आशिषकुमार बिरादार

सोनपेठच्या तहसिलदाराला लाच घेताना पकडले, एसीबीची मोठी कारवाई

सोनपेठ (जि.परभणी) : रेती व्यावसायिकाकडुन ५५ हजार रुपयांचा लाच घेतल्या प्रकरणावरून सोनपेठ तहसीलदार (Sonpeth Tahsildar) डॉ.आशिषकुमार बिरादार यांना लाच लुचपत खात्याने कंत्राटी कर्मचाऱ्यासह अटक केली आहे. सोनपेठ तालुक्यातील रेती वाहतुक करणाऱ्या व्यावसायिकास आपले वाहन चालवण्यासाठी व त्यावर कारवाई न करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याबाबत (Crime In Parbhani) व स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने तहसीलदार व त्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांला अटक केली आहे. याबाबत रेती व्यावसायिकांनी लाचलुचपत खात्याच्या पोलिस अधीक्षक अर्चना पाटील (ACB Superidendent Of Police Archana Patil) यांना तक्रार करून तहसीलदारांनी लाच मागितल्याची व आपली देण्याची इच्छा नसल्याचे तक्रार दिल्याने श्रीमती पाटील यांनी सदरील प्रकरण हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागास हस्तांतरित केले.

हेही वाचा: पंचायत समिती सदस्याचा अवेळी मृत्यू, अनेकांच्या घराला दिलाय आधार

यावरून ता.३० जुलै रोजी सदरील तक्रारीची शहानिशा करून सापळा रचण्यात आला. सोमवारी (ता.दोन) रोजी तक्रारदाराने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तहसीलदारांना भेटुन लाचेची रक्कम स्वीकारण्याची विनंती केली. त्यावरून तहसीलदार यांनी आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यास रक्कम स्वीकारण्यास सांगितले. कंत्राटी कर्मचाऱ्याने रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्याने तहसीलदार डॉ. आषिशकुमार बिरादार व कर्मचारी सय्यद ईसा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी चालू आहे.

Web Title: Anit Corruption Bureau Nabbed Sonpeth Tahsildar Ashishkumar Biradar In Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Parbhani
go to top