संघावरील बंदीच्या इतिहासाची तरुणांकडून होतेय जागृती 

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी विखारी वातावरण तयार केल्याचा ठपका ठेवत 4 फेब्रुवारी 1948 ला तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. सोमवारी (ता.चार) त्या घटनेला 70 वर्षे पूर्ण झाली. याची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी शहरात युथ फॉर डेमोक्रॅसी आणि निर्धार सोशल फाउंडेशनतर्फे सांस्कृतिक दहशतवाद विरोधी दिन पाळण्यात आला. 

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी हिंदू महासभेच्या नेत्यांनी गांधी स्मृतिदिनानिमित्त केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तरुणांनी आपले मत व्यक्त करून देशाच्या सद्यःस्थितीवर चर्चा केली. तसेच गांधी विचाराशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, असे मत अक्षय पाटील यांनी नोंदविले. 

ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. गुरुदत्त राजपूत, डॉ. दिलीप चव्हाण, राजवंश मुंढे, डॉ. उल्हास उढाण, बाळासाहेब गरुड उपस्थित होते. तसेच युथ फॉर डेमोक्रॅसी आणि निर्धार सोशल फाउंडेशनचे सदस्य अक्षय पाटील, प्रतीक पाटील, ऍड. संदीप पाटील, अमोल दांडगे, अक्षय जेवरीकर, मयूर सोनवणे, विशाल बन्सवाल, डॉ. कपिल झोटिंग, अक्षय शिंदे, नितीन कीर्तीशाही, योगेश सोळंके, सौरभ जाधव, ओंकार पाटील, भास्कर पाटील यांच्यासह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Anticultural Terrorism Day for RSS Ban Youth