Parli Vaijnath : शेतकऱ्याची मुलगी बनली अधिकारी ; गावकऱ्यांनी केला सत्कार; अपर्णा सोनवणेने मिळविले यश

गाढे पिंपळगाव येथील एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याची मुलगी मेहनतीच्या बळावर मंत्रालयात राज्य इन्व्हेस्टिगेटर (राज्य तपास अधिकारी) बनली आहे. याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने शनिवारी (ता. ३) तिचा सत्कार करण्यात आला.
पर्णा सोनवणेने
पर्णा सोनवणेने sakal

परळी वैजनाथ : तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याची मुलगी मेहनतीच्या बळावर मंत्रालयात राज्य इन्व्हेस्टिगेटर (राज्य तपास अधिकारी) बनली आहे. याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने शनिवारी (ता. ३) तिचा सत्कार करण्यात आला. गाढे पिंपळगाव येथील युवक काही वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगासह इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करत आहे.

नुकतीच गावातील भूमिकन्या अपर्णा अंकुश सोनवणे हिची मंत्रालयात राज्य इन्व्हेस्टिगेटर अधिकारी म्हणून निवड झाली आहे. अपर्णाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत, माध्यमिक शिक्षण विवेकानंद विद्यालय, उच्च माध्यमिक शिक्षण जीवन संस्कार गुरुकुल (परभणी) येथे तर बी.एस्सी. अग्रिचे शिक्षण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर (लातूर) येथे झाले.

पर्णा सोनवणेने
Beed : नाटकांसह दिग्गज कलावंत बीडकरांच्या भेटीला ; आज विभागीय नाट्यसंमेलन,नाट्यदिंडीने सुरवात

ती दहावीत असतानाच वडील अंकुश सोनवणे यांचे अपघाती निधन झाले. यामुळे अपर्णाचे ॲग्रीचे शिक्षण होताच आईने लग्नाची घाई केली. पण, तिचा चुलत भाऊ विष्णूने यास विरोध करत स्वतः मुंबईत असल्याने अपर्णातील गुण पाहून तिला स्पर्धा परीक्षा व बँकिंगच्या परीक्षा देण्यासाठी सोबत मुंबईला घेऊन गेला. अपर्णानेही जिद्दीने आत्मविश्वासाने बँकिंग व स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मंत्रालयात राज्य इन्व्हेस्टिगेटर अधिकाऱ्यांच्या जागा निघाल्या. यासाठी फॉर्म भरून परीक्षेची तयारी केली. मागच्या आठवड्यात परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत अपर्णा पास झाली. याबद्दल शनिवारी गावकऱ्यांच्या वतीने तिचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी तिची आई, भाऊ व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

१० वीत असताना वडिलांचे अपघाती निधन झाले. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे पुढील शिक्षण कसे पूर्ण करायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आई व भाऊ विष्णूने मला पाठबळ दिले, म्हणून मी पुढील शिक्षण पूर्ण करू शकले. मी एवढ्यावर थांबणार नसून आणखी स्पर्धा परीक्षा देणार असून, प्रशासनात वरिष्ठ अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे. आत्मविश्वास, मेहनत व जिद्द असेल तर कठिणातील कठीण यश प्राप्त करता येते.

- अपर्णा सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com