नळजोडणी अर्ज, मालमत्ता वसूलीसाठी ‘या’ शहरात लिपीक नागरिकांच्या दारात

vasuli
vasuli
Updated on

परभणी ः महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी सर्व वसुली लिपीकांना कार्यालयात न येता मालमत्ताधारकांच्या घरी जाऊन कर भरून घेण्याचे आदेश दिल्यामुळे अनेकजण प्रभागात फिरतांना दिसून येतात तर काही जण मात्र मोबाईल बंद करून मस्त घरीच झोपा काढीत असून त्यामुळे नागरिक समिती कार्यालयांना घिरट्या घालीत आहेत.

महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी ५० टक्के कर्मचारी कपातचे धोरण तर अवलंबलेच त्याचबरोबर मार्च एन्ड असल्या कारणाने सर्व वसुली लिपीकांना प्रभाग समिती कार्यालयात गर्दी होऊ नये, म्हणून नागरिकांच्या घरी जाऊन कर भरण्याची कार्यवाही करण्याचे सक्तीचे आदेश बजावले आहेत. तसेच नळजोडणीचे अर्ज देखील नागरिकांकडून घरीच भरून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार ज्या नागरिकांनी भ्रमणध्वणीद्वारे संपर्क साधला त्यांच्या घरी जाऊन अथवा नागरिक जिथे असतील तेथे जाऊन वसुली करीत आहेत.

अनेक वसुली लिपीक ‘नॉटरिचेबल’
आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार दिवसभर वसुली क्षेत्रात फिरून वसुली करणे आवश्यक असतांना अनेक वसुली लिपीक नॉटरिचेबल असून त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहेत. भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकत नसल्याने नागरिक मग थेट प्रभाग समिती कार्यालये गाठत असून तेथे देखील वसुली लिपीक भेट नसल्यामुळे त्यांना परत फिरावे लागत आहे. या प्रकरणी समितीच्या सहायक आयुक्तांनी मोबाईल बंद ठेवलेल्या वसुली लिपीकांवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

नागरिकांच्या तक्रारी बेदखल
मालमत्ता देयकात अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत. त्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी त्रुटींचा ताबडतोब निपटारा करण्यासाठी प्रत्येक समितीत अधिकारी नियुक्त केले होते. परंतू, हे अधिकारी तिकडे गेलेच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे वाढीव मालमत्ता कर, वाढीव शास्तीबाबत निर्णय घेण्यास कोणीही सक्षम अधिकारी नसल्यामुळे नागरिक समित्यांमध्ये खेटे मारून कंटाळत आहेत. 


नागरिक काही कारणांमुळे त्रस्त 
वास्तविक पाहता सर्व तक्रारी समिती कार्यालयात सोडवणे अपेक्षित असताना नागरिकांना मुख्य कार्यालयाचा रस्ता दाखवला जात आहेत. त्यामुळे देखील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबतही प्रशासनाने सहायक आयुक्तांना देयकातील त्रुटी दुर करण्याचे आदेश देऊन नागरिकांची ससेहोलपट थांबवणे गरजेचे आहे. प्रभाग समिती ‘अ व क’ ची कार्यालये तर दुसऱ्या मजल्यावर असून तेथे वयोवृध्द, आजारी, हृदयविकार असलेल्या नागरिकांची वारंवार खेटे मारावे लागत असल्याने दमछाक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com