हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

राजेश दारव्हेकर 
Tuesday, 22 December 2020

हिंगोली :  जिल्ह्यात कोरोनाची लस आल्यास ती देण्याचा क्रम निश्चित करण्यात आला असून यासाठी मनुष्यबळास प्रशिक्षण देण्याची तयारी देखील सुरू करण्यात येत आहे.  पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील पाच हजार ७०० जणांना लस मिळणार आहे. 

हिंगोली :  जिल्ह्यात कोरोनाची लस आल्यास ती देण्याचा क्रम निश्चित करण्यात आला असून यासाठी मनुष्यबळास प्रशिक्षण देण्याची तयारी देखील सुरू करण्यात येत आहे.  पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील पाच हजार ७०० जणांना लस मिळणार आहे. 

लस येणार असल्याच्या माहीतीने दिलासा मिळाला आहे. मात्र ती अद्याप उपलब्ध झाली नाही. ती आल्यावर हिंगोली जिल्ह्यात  सरकारी ४० संस्थांतील चार हजार २०० तर खाजगी १२० संस्थांतील एक हजार ५०० जणांना या लसीचा लाभ दिला जाणार आहे. एका सत्रात १०० जणांना लाभ दिला जाणार असून यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शिक्षण, महिला व बालकल्याण, पोलीस कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे.  त्यासाठी ६०० सत्र केले जाणार असुन तीन हजार कर्मचारी लागणार आहेत. 

हेही वाचा - नांदेड - बिदर रेल्वे मार्गसाठी जमीन अधिग्रहणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे निर्देश

जिल्ह्यात सर्वात आधी कोरोनाची लस सरकारी व खाजगी दवाखान्यातील यंत्रणेला दिली जाणार आहे. त्यानंतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना या लसीचा लाभ मिळणार आहे. तर हा वर्ग आटोपल्यानंतर ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना व त्यानंतर ज्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत अशांना लस दिली जाणार आहे. लस देण्या संदर्भात आरोग्य विभाग तालुका निहाय कर्मचाऱ्यांच्या बैठक घेत आहेत. आता लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात नव्याने दोन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसर एक व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे कळमनुरी परिसरात एक व्यक्ती असे एकूण दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर चार  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे देखील वाचाच - हिंगोली जिल्ह्यात जमिनीच्या फेरफारसाठी लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़. व  एका  रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायमॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.  तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

येथे क्लिक कराच - Video - किसान ब्रिगेडचा माहूर तहसीलवर मोर्चा

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण तीन हजार ४५९ रुग्ण झाले असून, त्यापैकी तीन हजार ३८२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण २५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५२ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आ हे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment Of Three Thousand Staff For Corona Vaccination Hingoli News